भुसावळातील प्रभाग 20 मध्ये विकासकामांना मंजुरी नाही : अपक्ष नगरसेवक राज चौधरी


भुसावळ (शनिवार, 18 जुलै 2026) : भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील विविध विकासकामांसाठी नगरसेवक राज चौधरी यांनी पालिकेकडे सादर केलेल्या 29 प्रस्तावांना अद्याप मंजुरी न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकामांच्या मंजुरीत होत असलेल्या विलंबामुळे प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडेच झालेल्या पालिकेच्या सभेत अजेंड्यावर 300 विषय होते मात्र अपक्ष नगरसेवक राज चौधरी यांनी 29 प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रभागातील कामे रखडली
अपक्ष नगरसेवक राज चौधरी यांनी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती, काँक्रीटीकरण, नाल्यांची उभारणी, एलईडी पथदिवे, स्वच्छता, सुशोभीकरण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक विविध कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असून त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.


ही कामे माझ्यासाठी नव्हती तर प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी होली, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने प्रस्ताव सादर केले होते मात्र अद्याप मंजुरी न मिळाल्याने विकासकामे रखडली असून नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सर्व प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी नगरसेवक राज चौधरी यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !