कुर्‍हा बायपास रस्त्याचा मार्ग मोकळा : आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश


मुक्ताईनगर (शनिवार, 18 जुलै 2026) : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथील वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या कायमची सोडवण्यासाठी नवीन बायपास रस्ता मंजूर करण्याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. कुर्‍हा गावातील वाढती रहदारी लक्षात घेता, मलकापूरकडे जाण्यासाठी हा बायपास रस्ता अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. या संदर्भात आमदार खडसे यांनी 5 जानेवारी, 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, कुर्‍हा येथे नवीन बायपास रस्ता मंजूर करण्याबाबतची मागणी रास्त असून, त्या दिशेने कार्यवाही सुरू आहे. सध्या या बायपास रस्त्यासाठी ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. भूसंपादनासाठीची प्राथमिक सर्वेक्षण प्रक्रिया हाती घेण्यात आले आहे. निधीची उपलब्धता, तांत्रिक निकष आणि कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन शासनस्तरावर करण्यात येत आहे. आमदार एकनाथराव खडसे यांच्या या सकारात्मक पाठपुराव्यामुळे कुर्‍हावासीयांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या बायपास रस्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !