रोटरी क्लब ऑफ भुसावळच्या नूतन अध्यक्षपदी मदन बोरकर
पदग्रहण सोहळा उत्साहात : सेक्रेटरीपदाची गोपीनाथ अय्यरांची स्वीकारली सूत्रे
भुसावळ (शनिवार, 18 जुलै 2026) : शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, हरविंदर सिंग थेठी आणि राजीव शर्मा यांची उपस्थिती होती.
नूतन पदाधिकार्यांनी स्वीकारला पदभार
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळते अध्यक्ष संजय चापोरकर यांनी मागील वर्षातील रोटरी क्लबच्या कार्याचा आणि विविध सामाजिक उपक्रमांचा अहवाल उपस्थितांसमोर वाचन करून दाखवला. मावळते अध्यक्ष संजय चापोरकर यांनी नूतन अध्यक्ष मदन बोरकर यांच्याकडे अध्यक्षपदाची तर मावळते सेक्रेटरी रत्नाकर क्षीरसागर यांनी नूतन सेक्रेटरी गोपीनाथ अय्यर यांच्याकडे आपल्या पदाची सूत्रे सोपवली.


यांची होती उपस्थिती
प्रसंगी हरविंदरसिंग थेठी, राजीव शर्मा, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि नूतन अध्यक्ष मदन बोरकर यांनी क्लबच्या भावी वाटचाली संदर्भात आणि सामाजिक बांधिलकीवर मार्गदर्शन केले. राधेश्याम लाहोटी, जी.आर.ठाकूर, रजनी सावकारे, सरला बोरकर, उदय बोरकर, ईश्वर बोरकर, श्वेता बोरकर, नगरसेवक परीक्षीत बर्हाटे, नाना पाटील, गणेश सोनवणे, हिरामण मोरे, संदीप चव्हान, सुनील गायकवाड सतीतश झांबरे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यतर आभार मंगला पाटील यांनी मानले.