भुसावळातील बीएलओ यांचे राजकीय पक्षाच्या तंबूत बसून काम : मनसेची तक्रार

निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा तक्रारीत दावा


भुसावळ (सोमवार, 20 जुलै 2026) : शहरात एसआयआर मॅपिंगचे काम निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आले असलेतरी शहरातील बहुतांश बीएलओ हे विविध राजकीय पक्षांनी उभारलेल्या तंबूत जावून काम करीत आहेत. हा प्रकार म्हणजे निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणार आहे. या संदर्भातील तक्रार मनसेने प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे केली आहे.

काय आहे निवेदन ?
मनसेच्या तक्रारीनुसार, बीएलओ यांनी एसआयआरचे काम मतदारांच्या घरी जावून करण्याऐवजी राजकीय पक्षाच्या टेन्टमध्ये जावू सुरू केले आहे. या टेन्टमध्ये नागरिकांना बोलावून एसआयआर प्रक्रिया केली जाजत असून हा प्रकार म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. अशा प्रकारामुळे मतदारांची खरी माहिती गोळा होत नाही आणि माहितीमध्ये चुका होण्याची शक्यता अधिक आहे. विशिष्ट पक्षाकडे मतदारांची माहिती जमा होत आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बीएलओ यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या टेन्टमध्ये बसून काम केल्यामुळे सर्वसामान्य मतदारांचा मतदानाच्या प्रक्रियेवरील व बीएलओच्या निपक्षपाती पणावरील विश्वास उडू शकतो. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून बीएलओ यांना समज देऊन त्यांना तत्काळ राजकीय पक्षाच्या टेन्टमधून हटवून आपल्या बुथ क्षेत्रातील घरांना भेटी देण्यासंदर्भात निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. बीएलओ नागरिकांच्या घरीदेखील जातील, असे यावेळी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

यांची होती उपस्थिती
मनसेचे शहराध्यक्ष दीपक आत्माराम सोनवणे, प्रणय भागवत, प्रतीक भंगाळे, विशाल कोळी, विलास कोळी, दशरथ सपकाळे, सुशील मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !