कोठली विद्यालयात स्व.अजित पवारांचे चित्र रेखाटत विद्यार्थ्यांनी जयंती केली साजरी


भडगाव (बुधवार, 22 जुलै 2026) : भडगाव तालुक्यातील कोठली येथील कै. गु.ज.सोनवणे माध्यमिक विद्यालयात राज्याचे माजी उपमुख्यमंञी स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांनी स्व. अजित पवार यांचे सुंदर चित्र रेखाटले.

यावेळी विद्यार्थ्यांना अजित पवारांच्या जीवनावर आधारित डिजिटल माहिती दाखवण्यात आली. यासाठी कला शिक्षक संदीप जयसिंग परदेशी शिक्षक भारती संघटना जिल्हाध्यक्ष कलाध्यापक संघ, जळगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार एम.के.पाटील व संस्थेचे पदाधिकारी रामकृष्ण मोतीराम पाटील, पुण्याचे उद्योजक रामदास मोतीराम पाटील, चाळीसगावचे लक्ष्मण चव्हाण, मुख्याध्यापक चंद्रकांत भोसले यांनी कौतुक केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !