गोंडगाव विद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार जयंती साजरी
भडगाव (बुधवार, 22 जुलै 2026) : भडगाव तालुक्याील गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती बुधवार, 22 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुख्याध्यापक बी.जी.ननावरे यांच्याहस्ते स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक सी.एस.सोन्नीस, एस.डी.चौधरी, आर.एस.देवकर, व्ही.ए.पाटील, एस.वाय.पाटील, पी.व्ही.सोळंके, बी.डी.बोरसे, आर.एस. सैंदाणे, एस.आर.महाजन, लिपिक पी.जे.देशमुख, एस.जी.भोपे, ए. एम.परदेशी, एसएल.मोरे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




