भुसावळातील महाराणा प्रताप विद्यालयात विठू नामाचा गजर

टाळ मृदुंग आणि विठू नामाच्या गजरात निघाली दिंडी


भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2026) : शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राची अलौकिक परंपरा वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी धरला ठेका
दिंडीच्या अग्रभागी संतांच्या वेशभूषेमध्ये असलेले विद्यार्थी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, रामदास स्वामी सर्वांचे आकर्षण ठरले. तदनंतर वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी भजन, अभंगावर ठेका धरला. लयबद्ध हालचाली, टाळ मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. शाळेपासून निघालेली दिंडी गोविंद कॉलनीतील विठ्ठल-रूखमाई मंदिरामध्ये जाऊन पोहोचली मंदिरात सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक पंकज साखरे यांनी महाराष्ट्राची अलौकिक परंपरा वारकरी दिंडी याची माहिती दिली,

विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश चौधरी व पर्यवेक्षक नारायण घोडके यांच्याहस्ते महाआरती झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी रांगेत दर्शन घेतले. यावेळी जय मातृभूमी क्रीडा मंडळातर्फे विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आली. दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !