भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात
भुसावळ (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सत्र 2026/27 साठी नवीन विद्यार्थी परिषदेच्या गठनासाठी पदग्रहण समारोह 5 रोजी उत्साहात झाला.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, प्रिंसिपल निना कटलर उपस्थित होत्या. नवनिर्वाचित पदाधिकार्यांना बॅच लावून शाळेची मर्यादा राखण्याची व आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची शपथ देण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी कॉन्टिन्जेंट लीडर
सोफिया पी बॉडी, हेड बॉय शौर्य देशमुख, हेड गर्ल कनिष्का खंडारे, असिस्टंट हेड बॉय वेदांत सरोदे, असिस्टंट हेड गर्ल बुशरा सैय्यद, हाऊस लीडर्स रेड हाऊस गायत्री घिर्णीकर, येलो हाऊस पंकज राठोड, ग्रीन हाऊस, मनीषा किरंगे, ब्लू हाऊस सोनाली शिवरामे तर विभाग प्रमुख सांस्कृतिक, क्रीडा, शिस्त, शैक्षणिक, योगा, चित्रकला, आरोग्य व स्वच्छता राजदूत म्हणून प्रभारी शिक्षक प्रीती बुटी, शोएब शाह यांची बॅच देऊन नियुक्ती करण्यात आली.
देशाचे चांगले नागरिक बना : उपअधीक्षक
प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, शिस्त, देशभक्ती व चांगला नागरिक बनण्याचे गुण यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी सर्व पदाधिकार्यांना व विद्याथ्यांना शुभेच्छा दिल्या.
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा यांनीदेखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रिया रायन व सोफिया पीबॉडी यांनी तर आभार श्रद्धाली घुले यांनी मानले.