भुसावळात रेल कामगार सेनेच्या घोषणांनी रेल्वे परिसर दणाणला : विविध मागण्यांसाठी उपोषण
भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत, सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशाने रेल्वे कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच रेल्वे कर्मचार्यावर होणारा अन्याय दूर होण्यासाठी रेल कामगार सेनेतर्फे भुसावळातील डीआरएम कार्यालयाबाहेर सोमवार, 10 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या मागण्यांसाठी धरणे आंदोलन
भुसावळातील डीआरएम कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लावावा, वेगवेगळ्या विभागात रेल्वे कर्मचार्यांना ड्रेस कोड देण्यात यावा तसेच जे एसएसई एकाच जागेवर चार वर्षापासून कार्यरत आहेत त्यांची बदली करण्यात यावी, रेल्वे रुग्णालयात त्वया रोग स्पेशालिस्ट व नाक, कान, घसा स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, भुसावळात सोनोग्राफी चेक करण्यासाठी मोठ्या रुग्णालयांशी टायअप करावा, टीआरडी विभागातील कर्मचार्यांना जोखीम भत्ता देण्यात यावा, भुसावळातील सर्व विभागात पीएमसी सुरु करण्यात यावी, जे रेल्वे कर्मचारी चांगले व अती उत्कृष्ठ कार्य करत असतील त्यांना महाप्रबंधक पारितोषीक देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन अपर मंडळ रेल प्रबंधक प्रवीण कुमार पाठक यांना देण्यात आले.




यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, मंडल सचिव राजेश लखोटे, कार्याध्यक्ष प्रितम टाक, कोषाध्यक्ष योगेश माळी, संयुक्त सचिव विनोद वाघे, उपाध्यक्ष अरविंद थोरात, पंकज ठाकरे, शांताराम सपकाळे, शेख शकील शेख सत्तार, प्रकाश करसाले, मोहन राजपूत, संतोष देशमुख, भरत शर्मा, सुरेश दरेकर, नितीन अमरोही, कमलाकर बाणाईत, रोहीत गायकवाड, अभिषेक गादेल्लू, सदानंद ब्राम्हणे, दीपक जोहरे, प्रमोद हिवरे, रमेश मराठे, रोषण तांबट, मुकेश महाजन, कृष्णा भोंडवे, गोपाल पाटील, तुषार जाधव, महेंद्र भोळे, दीपक जोहरे, अर्जुन फरहाटे, निरंजन राऊत, राजेश दुर्गना, रमेश मोटे, दिनेश सोनवणे, डी.पी.ढगे, एम.के.शहा, पूर्वेश सोनवणे, गणेश पाटील, शुभम तराले, पंकज पाटील, अजय नरवाडे, आय.डी.ठाकूर, सुरेश वानखेडे यांच्यासह रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.