व्हिडीओ कॉल करीत भीती दाखवून लुबाडणार्‍यांपासून रहा सावध : टीना पाटील

सांगवी बुद्रुक येथे ज्योती विद्या मंदिर शाळेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम


Digital Arrest Is a Fraud: Cyber Expert Tina Patil Warns Students in Yawal यावल (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : सध्या व्हिडिओ कॉलवर आपण पोलीस अधिकारी आहोत, असे सांगत भीती दाखवून डिजिटल अरेस्टच्या नावाने लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे. अशा कोणत्याच प्रकारची डिजिटल अरेस्ट होत नाही, तेव्हा असे कॉल आल्यास स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी व फसवणूक टाळावी असे प्रतिपादन सायबर तज्ज्ञ टीना पाटील यांनी केले. त्या सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर शाळेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

सायबर सुरक्षे अंतर्गत मार्गदर्शन
सांगवी बुद्रुक येथे ज्योती विद्या मंदिर शाळेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर शिक्षा व सुरक्षा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सोमवारी हा कार्यक्रम पार पडला. यात हॅकर मास्कच्या माध्यमातून सायबर फसवणुकीचे प्रात्यक्षिक सायबर तज्ज्ञ टीना पाटील आणि दर्शना चौधरी सादर केले. व्हीडीओ कॉलवर आपण पोलीस अधिकारी आहोत, असे सांगत भीती दाखवुन डिजिटल अ‍ॅरेटच्या नावाने लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे. त्यापासून सुरक्षीत राहण्याचे आवाहन टीना पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देताना केवळ व्याख्यान न देता समाजात आजवर कशा प्रकारे प्रत्यक्षात नागरीकांना सायबर ढगांनी फसवले याची माहिती दिली.




बनावट लिंकपासून सावधान
हॅकर मास्कच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार लोकांना कशाप्रकारे आकर्षक संदेश पाठवतात, बनावट लिंक किंवा फोन कॉलच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न करतात, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यावेळी ओटीपी, युपीआय फिशिंग, क्युआर कोड, केवायसीच्या माध्यमातून फसवणूक, सोशल मीडिया, फोटो मॉर्फिंग, बनावट अकाउंट, पासवर्ड चोरी आणि ऑनलाइन व्यवहारातील फसवणूक यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक आर.एस.भंगाळे होते. प्रमुख उपस्थितीत उपमुख्याध्यापक चंद्रकांत फिरके होते. आभार प्रसेनजित बाविस्कर यांनी मानले.

क्लीक करण्यापूर्वी विचार करा
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सोशल लनेटवर्कवर अनेक ग्रुपवर लिंक टाकलेल्या असतात त्यांना क्लिक करण्यापूर्वी विचार करावा. अनोळखी लिंक ओपन केल्याने मोबाईल हॅक होवू शकतो तसेच ओटीपी हा कुणा सोबत शेअर करू नका, सायबर क्षेत्रात अनेक प्रकारे फसवणुक होवू शकते मात्र आपण कसे सुरक्षित रहावे याची माहिती व मार्गदर्शन प्रसंगी करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !