वरणगावात एमआयडीसीसाठी दीडशे एकर जागा शासनाने उपलब्ध करून द्यावी : नगराध्यक्ष सुनील काळे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


वरणगाव (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : वरणगाव शहर व परिसरातील गाव खेड्यातील शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित तरुण तरुणींच्या, महिला भगिनींच्या हाताला काम मिळावे, कौशल्यधारक पात्र तरुण -तरुणींना लघू उद्योजक होता यावे यासाठी वरणगावात एम.आय.डी..सी. उभारावी, असा ठराव वरणगाव नगर परिषदेने मंजूर केला होता . त्या अनुषंगाने लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना प्रस्ताव सादर केला होता.

त्या नुसार उद्योग विभागाच्या महासंचालक सोनी यांनी जिल्हा व्यस्थापक यांना जागा मागणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या नुसार जिल्हा व्यवस्थापक यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांना पत्र देऊन शंभर ते दीडशे एकर जमिनीची मागणी केली आहे .




वरणगाव येथे पंधरा एकरच जागा उपलब्ध असल्याने लागणारी शंभर एकर महसूल विभागाकडे उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे. या आशयाचे पत्र भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांना त्यांनी पाठवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !