गोंडगाव विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान
भडगाव (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : भारत सरकार व ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय माऊंट आबु शाखा, कजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान राबवण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे होते. सुरुवातीस विद्यालयाामार्फत उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविदयालय कजगाव शाखेच्या संचालिका बी.के.चंद्रकलादेवी यांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्तीचे महत्व पटवुन दिले आणि उपस्थितांना नशा मुक्त राहण्याची प्रतिज्ञा दिली.





या कार्यक्रमास अॅड.वसुधा पाटील, बी.के.सोनाली दिदी कजगाव, जि. प.मराठी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष देविदास पाटील, मच्छींद्र शार्दुल, शिव व्याख्याते दत्तू मांडोळे, फौजी राजेंद्र मांडोळे, पत्रकार सतीष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासुन दूर राहण्याचे आवाहन केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन एस.आर.पाटील तर आभार क्रीडा शिक्षक एस.डी.चौधरी यांनी मानले.