भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची सभा : अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे
उपाध्यक्षपदी आशा पाटील तर सचिवपदी डॉ.कुंदा चौधरींची निवड
भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : शहरातील कला, विज्ञान व पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात नुकतीच 2026-27 साठी पालक शिक्षक संघ कार्यकारणी जाहीर करण्यात आली. प्रसंगी अकरावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करून गुणगौरव करण्यात आला.
असे आहे नूतन पदाधिकारी
अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे तर उपाध्यक्षपदी आशा कैलास पाटील व सचिवपदी प्रा.डॉ.कुंदा मुरलीधर चौधरी यांची निवड करण्यात आली.




संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमारजी नाहाटा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले. उपप्राचार्य वाय.एम पाटील प्रास्ताविक सादर केले. विद्यार्थ्यांमधून गुंजन अत्तरदे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच माजी उपाध्यक्ष रजनी सावकारे व हिशोब तपासणी मुकेश अग्रवाल यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.स्वप्ना फेगडे तर आभार प्रा..एच.बी.राजपूत यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
पर्यवेक्षिका स्वाती पाटील, समिती सदस्य प्रा.जे.ए.चौधरी, प्रा.एस.एम.फेगडे, प्रा.एस.एम.सोनवणे, प्रा.एच.बी.राजपूत, प्रा.जे.टी.बेंडाळे, प्रा.एम.एल.गोसावी, प्रा.एन.एस.गवळी यांनी सहकार्य केले.