श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे स्वातंत्र्यदिनी चोरवडसह खेडी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने चोरवड व खेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, पेन्सील, वही, पॅड आदी साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हाध्यक्ष संदीपसिंग राणा, महिला जिल्हाध्यक्ष सारिका राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष मीना राजपूत, जिल्हा सचिव कविता राजपूत, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, नितीन पाटील, महिला तालुकाध्यक्ष जयश्री पाटील, चोरवड-खेडीचे लोकनियुक्त सरपंच भैय्या महाजन, गणेश राजपूत, ग्रा.पं.सदस्य विरेंद्रसिंग पाटील, सागर राजपूत, चोरवड मुख्याध्यापक रंजना पाटील, शिक्षिका विजया परदेशी, जितेंद्र पाटील, पंकज चौधरी, जिल्हा सचिव चंदू चव्हाण, खेडी येथील मुख्याध्यापक प्रमोद गांधेले, शिक्षिका गीता राजपूत, पी. पाटील, रमाकांत पिंपळे, कोमलसिंग महाजन, विलास महाजन, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रसिंग चौधरी, ईश्वर भोळे, जगनसिंग महाजन आदी उपस्थित होते. प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रमोद गांधेले तर आभार शिक्षिका गीता राजपूत यांनी मानले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !