भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : शहररातील महेश नगरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या परिसरात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, शाळेच्या प्राचार्या अनघा पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला.





विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि राष्ट्रप्रेमाचे महत्त्व आपल्या सादरीकरणातून अधोरेखित केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !