प्रवास होणार अधिक सुखद : भुसावळ एस.टी.आगाराच्या ताफ्यात पाच जिजाऊ बसेस दाखल
मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते बसेसचे लोकार्पण : ग्रामीण भागातील प्रवाशांची होणार सोय
Five Jijau Buses Added to Bhusawal ST Depot Through Minister Sanjay Savkare’s Efforts भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी भुसावळ आगाराच्या ताफ्यात पाच जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण रविवार, 16 रोजी मंत्री सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. या बसेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद व सुखद होणार आहे.
15 बसेसची मागणी
भुसावळसह परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी पाच जिजाऊ बसेस व दहा लालपरी बसेसची मागणी केल्यानंतर यापूर्वी पाच बसेस उपलब्ध झाल्या होत्या तर आता नव्याने पाच जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
मंत्री सावकारे यांच्याहस्ते फित कापून व नारळ वाढवून बसेसचे लोकार्पण करण्यात आले. नगरसेवक राजेंद्र आवटे, नाना पाटील, सुनील वानखेडे प्रमुख पाहुणे होते. आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, स्थानकप्रमुख जयेश लोहार, मयूर काळे, सुरज पवार, शांताराम चौधरी, सहायक कार्यशाळा अधीक्षक राहुल सोनवणे, भूषण महाजन आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन धर्मराज देवकर यांनी केले. सजावटीसाठी जितेंद्र डोळसे, संदीप महाजन, भूषण महाजन, सतीश बोंडे, धर्मराज देवकर, खेमचंद पाटील, किरण तायडे, नितीन सोनवणे, इरफान तडवी आदींनी सहकार्य केले.
