भुसावळातील प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना प्राईड ऑफ भारत राष्ट्रीय प्रतिभा-सन्मान पुरस्कार

सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश कुमार मिश्राजी यांच्याहस्ते सन्मान


भुसावळ (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन आणि राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार समारंभ छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय ऑडिटोरियममध्ये झाला. या कार्यक्रमात भुसावळातील सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना प्राईड ऑफ भारत राष्ट्रीय प्रतिभा-सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यांनी केला सन्मान
सेवानिवृत्त प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तसेच माजी विधी सल्लागार, छत्तीसगडचे राज्यपाल भीष्म प्रसाद पाण्डेय, छत्तीसगड योग आयोगाचे अध्यक्ष संजय अग्रवाल, महापौर मीनल चौबे, रायपूर आमदार पुरंदर मिश्राजी, के.पी.एस. प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेशकुमार मिश्रा यांच्याहस्ते प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना सन्मानीत करण्यात आले.
गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक, सामाजिक, सहकार, साहित्यिक, धार्मीक, अध्यात्मीक, गोसेवा, शेती, पर्यटन, दातृत्व अशा क्षेत्रांत केलेल्या असामान्य योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात प्रदेश प्रभारी, पतंजलि योग समिती, छत्तीसगड डॉ.मनोज पाणीग्रही; छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्रातील प्रा.डॉ.पंढरीनाथ रोकडे, मुंबईतील डॉ.गौतम ऋषि मोरे तसेच भोपाल येथील महान साहित्यिक डॉ.सुनिता पेंद्रो, ललित ज्वेलर्सचे ललीत टाटीया यांची विशेष उपस्थिती होती. समारंभाचे मुख्य संयोजक ऍड. क्रांती महाजन होते. हे आयोजन रेडियंट टॅलेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या संकल्पनेनुसार आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच प्रतिभा-सन्मानाशी संबंधित संस्थांच्या सहकार्याने आणि समन्वयाने करण्यात आले.

पुरस्काराने वाढते सामाजिक जवाबदारी
मुख्य संयोजक आणि राष्ट्रीय प्रतिभा-सन्मान अभियानाचे प्रवर्तक ऍड. क्रांती महाजन म्हणाले की, पुरस्कार केवळ सन्मानाचे प्रतीक नसतात, तर ते प्रतिभांना नवी ऊर्जा, प्रेरणा आणि सामाजिक जबाबदारी देतात. त्यांनी म्हटले की, प्रतिभेचा सन्मान, संस्कृतीचे संरक्षण आणि राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा ही या अभियानाची मूळ भावना आहे.

प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी म्हणाले की, भारताच्या विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा देशाची खर्‍या अर्थाने शक्ती आहेत. त्यांना एकमेकांशी जोडून एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना आणखी बळकट करता येईल.

समारंभात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या प्रतिभावान व्यक्तींना विविध सन्मान प्रदान करण्यात आले. त्यात प्रमुख रूपाने छत्तीसगड रत्न पुरस्कार, छत्तीसगड नारी शक्ती पुरस्कार, प्राइड ऑफ भारत पुरस्कार, कला शिरोमणी पुरस्कार, समाज सेवा शिरोमणी पुरस्कार तसेच विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रतिभा सन्मानांचा समावेश होता. सन्मानांद्वारे त्या व्यक्तींच्या योगदानाची नोंद घेण्यात आली, ज्यांनी आपापल्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाज, संस्कृती आणि राष्ट्राच्या विकासात सकारात्मक भूमिका बजावली आहे. समारंभात महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक समन्वयाचाही विशेष संदेश देण्यात आला.

दरम्यान, प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर मित्र परिवार, आप्तस्वकीय, नातेवाईक व सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !