भुसावळात भगवान श्री जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्सवासाठी समितीची निवड
अध्यक्षपदी नितीन करोसिया तर उपाध्यक्षपदी करण लखन यांची निवड
भुसावळ (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : भगवान श्री जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्सव 2026 च्या अनुषंगाने भुसावळ शहरातील उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नितीन करोसिया तर उपाध्यक्षपदी करण लखन यांची निवड करण्यात आली. यंदा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याचे निवडीनंतर पदाधिकार्यांनी सांगितले. या निवडीबद्दल समाजबांधवांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भगवान श्री जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक उपक्रमांना चालना देण्याबरोबरच समाजातील एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
नवीन पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा भगवान श्री जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नूतन अध्यक्ष नितीन करोसिया व उपाध्यक्ष करण लखन यांच्या निवडीबद्दल समस्त भुसावळ सकल पंच, वाल्मीकि मेहतर समाज, देविदास घरियाना तसेच नाथ धुरियाना समाज आणि गोगादेव भक्तांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
