भूमिगत गटार योजनेला मान्यता : वरणगावात नगराध्यक्ष सुनील काळे व कार्यकर्त्यांचा जल्लोष


वरणगाव (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : वरणगाव शहरासाठी भूमिगत गटार योजनेला मान्यता मिळाल्यानंतर रविवार, 6 रोजी तिरंगा सर्कल येथे वरणगावकरांनी फटाके फोडून व बुंदी वाटून जल्लोष केला.

पाठपुराव्याला आले यश
वरणगाव शहरासाठी भूमिगत गटार प्रकल्प होण्यासाठी गत आठ महिन्यापासून लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी कंबर कसली होती. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने वरणगाव शहरासाठी भूमिगत गटार प्रकल्पाला 3 सप्टेंबर रोजी मान्यता देताच वरणगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. रविवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन समर्थकांनी तिरंगा सरकल येथे फटाके फोडून बुंदी वाटून मोठा जल्लोष साजरा केला.

लवकरच मिळणार तांत्रिक मान्यता
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द हा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. यापुढे या प्रकल्पासाठी तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता मिळून लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी धडक प्रयत्न केले जातील. भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक नाना चौधरी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, शहराध्यक्ष सुनील माळी, कामगार नेते मिलिंद मेढ, युवा अध्यक्ष निमकर मिलिंद भैसे, अजमल खान, फजल भाई, डॉ.सादीक शेख, साबीरभाई कुरेशी, योगेश माळी, नगरसेवक नाना चौधरी, हितेश चौधरी, एम.के.सुरवाडे, शालिग्राम डोईसे, भोजराज पालवे, मुस्लीमभाई अन्सारी, कलीमभाई शेख, खलील कुरेशी, कुंदन माळी, तेजस जैन यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !