रावेरात मनोज जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन

मागण्या मान्य करण्याबाबत मराठा समाजाचे प्रशासनाला निवेदन


रावेर (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रमुख मागण्यांना रावेर तालुक्यातील सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. शासनाने या या मागण्या ताबतोड मान्य कराव्यात, अशी आग्राही मागणी रावेर तहसीलदार प्रशासनाकडे निवेदन देवून करण्यात आली.

आंदोलनाला पाठिंबा
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनास रावेर तालुक्यातील समाजबांधवांनी पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक व ठोस निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




यांची होती उपस्थिती
निवेदन देताना माऊली फाऊंडेशन अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, मराठा समाज तालुकाध्यक्ष उमाकांत महाजन, दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, घनशाम पाटील, पत्रकार शालिक महाजन, बाजार समिती संचालक गणेश महाजन, नगरसेवक राजू ठेकेदार, डॉ.सुरेश पाटील, सी.एस.पाटील आदी सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !