साकळी गावातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


यावल (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील साकळी गावातील शनी पेठ भागातील 26 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार मंगळवारी उडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विनोद जीवन बडगुजर उर्फ सोन्या (26) असे मृताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
साकळीतील शनिपेठ भागातील रहिवासी विनोद जीवन बडगुजर उर्फ सोन्या या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात जीवन बडगुजर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, पोलीस हवालदार रोहील गणेश करीत आहे. तरुणाने आत्महत्या का केली ? हे मात्र कळू शकले नाही.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !