किनगावातील हॉटेल जत्रासमोर दुचाकीला चारचाकीची धडक : दोघे जखमी
यावल (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथून चोपडा जाणार्या रोडवर असलेल्या हॉटेल जत्राच्या समोर एका दुचाकीला स्विफ्ट कारणे धडक दिल्याने दोघै जखमी झाले. हा अपघात 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडला. अपघात प्रकरणी यावल पोलिसात स्विप्ट कारवरील अज्ञात चालकाविरुद्ध मंगळवारी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातात दोघे जखमी
किनगाव गावातून चोपडा जाणार्या रोडवर हॉटेल जत्राच्या पुढे बाबुराव शंकर वराडे यांच्या शेताजवळून मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 19 सी.सी. 9861) द्वारे कल्पेश दिनकर पाटील (25) व कुलदीप रवींद्र पाटील (25, दोघे रा.नायगाव, ता.यावल) हे किनगावकडे येत असताना किनगावकडून चोपड्याकडे भरधाव वेगाने जाणार्या स्विफ्ट कार (क्रमांक जी.जे. 17 बी. एच. 8772) वरील अज्ञात चालकाने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता जळगाव रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात निलेश हिंमतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.




