एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार


जळगाव (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : एरंडोल शहर व परिसरात गुन्हेगारी टोळी तयार करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याची प्रवृत्ती असलेल्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एक वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तीन सदस्यांची टोळी एक वर्षांसाठी हद्दपार
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख शुभम कैलास महाजन (18, रा.नागोबा मढी, एरंडोल), टोळी सदस्य पवन प्रकाश मराठे (19, रा.अमळनेर दरवाजा, एरंडोल) व शुभम उर्फ झिंग्या दत्तात्रय पाटील (25, रा.अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार या टोळीविरुद्ध एरंडोल पोलिसात विविध गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सुधारणा न झाल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 55 अन्वये तिघांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !