हद्दपार आदेशाचे उल्लंघन : शिरपूरातील संशयीताविरोधात गुन्हा
धुळे (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : गुन्हेगारी पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतरही कोणतीही पूर्वपरवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आलेल्या तरुणाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम शरद माळी (29, रा.चत्रुशेठजी चाळ, भंडारी टॉकीजजवळ, शिरपूर, जि.धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
आदेशाचे उल्लंघन
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 29 सप्टेंबर रोजी ऑल आऊट स्कीमदरम्यान शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना संशयीत शुभम माळी हा हद्दपारीचा आदेश लागू असतानाही कोणतीही परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक चेतन मुंढे, अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, राहुल गिरी, हर्षल चौधरी, हेमंत मिस्त्री आदींच्या पथकाने केली.
