दहशतीसाठी बाळगला कट्टा : शिरपूर तालुक्यातील दोघे धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात


धुळे (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी कट्टा (पिस्तूल) व जिवंत काडतूस बाळगणार्‍या दोघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. त्यानुसार 27 ऑगस्ट 2026 रोजी संशयीत संजय प्रेमसिंग पावरा (19, रा. नावदेवी, कोळीद, ता.शिरपूर, जि.धुळे) यास धुळ्यातील एकवीरा देवी मंदिर परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आला. हा कट्टा संशयीताने त्याचा मित्र सुनील दशरथ पावरा (23, रा.सांगवी, ता.शिरपूर, जि.धुळे) याच्याकडून घेतल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली. 40 हजार रुपये किंमतीचा कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, शशिकांत देवरे, राहुल सानप, आरीफ पठाण, संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, शिरीष भदाणे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !