जुन्या वादातून साकेगावातील तरुणांवर चाकूने हल्ला ; संशयीत भुसावळातील रहिवासी : एकाला अटक


भुसावळ (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : एका महाविद्यालयात झालेल्या वादातून साकेगावातील दोन तरुणांवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 29 रोजी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात राहुल उर्फ ईश्वर संतोष कोळी (22, रा.साकेगाव) आणि त्याचा मित्र कुणाल बाळू वाघ (24) हे दोघे जखमी झाले आहेत. घटना घडताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल होताच भुसावळातील संशयीताला अटक करण्यात आली.

जुन्या वादातून टोळक्याचा हल्ला
समजलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे 7:45 वाजता राहुल कोळी व कुणाल वाघ हे दोघे साकेगाव बसस्थानक परिसरात थांबलेले असताना भुसावळातील टोळके आले व त्यांनी राहुलकर हल्ला केला तर मध्यस्थीसाठी गेलेला कुणाल वाघ हा देखील या हल्ल्यात जखमी झाला. ऐन गर्दीच्या वेळी बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी मंगळवारी रात्री पावणेआठ वाजता हा थरार घडल्याने काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

भुसावळातील संशयीताला अटक
सूत्रांच्या माहितीनुसार, एका महाविद्यालयात तरुणांमध्ये वाद झाला होता व त्या वादातून साकेगावातील तरुणावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी कैलास कोळीसह त्याच्या पाच मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला असून कैलास दिनेश कोळी (22, जुना सातारा, भुसावळ) यास अटक केली आहे. तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !