लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर हाशीम मुसा चकमकीत ठार


जम्मू काश्मिर (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर प्रत्युत्तरात झालेल्या गोळीबारात लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर हाशीम मुसा चकमकीत ठार झाला. सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात ही कारवाई केली. ही चकमक युसमार्ग भागातील ‘कोराग’ परिसरात झाली.

ऑपरेशन कोराग
सुरक्षा अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख ‘मुसा’ अशी पटली आहे. विविध अहवालांमध्ये त्याला सुलेमान शाह (उर्फ मुसा), फौजी मुसा आणि मोहम्मद आसिफ (उर्फ हाशिम मुसा) अशा नावांनी संबोधले गेले आहे. भारतीय लष्कराने या चकमकीला ’ऑपरेशन कोराग’ असे नाव दिले होते. या भागात इतर दहशतवादीही लपून बसले असावेत अशी माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे तेथे शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये पाच दहशतवादी मारले गेले. 5 सप्टेंबर रोजी बडगाममध्ये यासिरला ठार करण्यात आले. 17 सप्टेंबर रोजी उधमपूरमध्ये सद्दाम आणि मुस्तफा या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला आणखी एका दहशतवाद्याचा कुजलेला मृतदेहही सापडला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !