आव्हाणे गावातील नितीन जगदाळे बेपत्ता
आव्हाणे, ता.जळगाव (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : गावातील रहिवासी नितीन अर्जुन जगदाळे (43) हे शुक्रवार, 11 रोजी सायंकाळी राहत्या घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. कुटूंबियांनी सर्वदूर शोध घेतल्यानंतर त्यांचा तपास न लागल्याने जळगाव तालुका पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगाने गोरा, वय 43 तसेच अंगात त्यांनी ग्रे रंगाचा शर्ट परिधान केला आहे. संबंधित व्यक्ती कुणालाही आढळल्यास तातडीने 9370128236 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे. तपास तालुक्याचे सहाय्यक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.
