शिंदखेड्यात शासकीय कार्यालयाच्या आवारातून मालकासह चालकाने लांबवले ट्रॅक्टर

शिंदखेडा पोलिसांनी ठोकल्या आरोपींना बेड्या : साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत


शिंदखेडा (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : शासकीय कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर चोरी करणार्‍या ट्रॅक्टर मालक व चालकाला शिंदखेडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दोघांकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रॅक्टर मालक निलेश विश्वास पाटील (35) व ट्रॅक्टर चालक अजय भगवान भील (20, अलाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण ?
27 सप्टेंबर 2026 रोजी भर दुपारी एक वाजता शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करून ठेवण्यात आलेले वाळूने भरलेले ट्रॅक्टर आरोपींनी कार्यालयात प्रवेश करून चोरून नेले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय कार्यालयातून चोरी झाल्याने पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला. तहसील कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असता ही चोरी चालकासह मालकानेच केल्याचे स्पष्ट होताच आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून साडेचार लाख रुपये किंमतीची ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मयूर भामरे, अंमलदार अकिल पठाण, गणेश सोनवणे, प्रशांत पवार, कैलास चौधरी, रुपेश चौधरी, कमलेश कोठावदे, चेतन माळी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !