किनगावातील गोमांस प्रकरण : आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी
यावल (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथे गोवंश कत्तलीच्या संशयावरून यावल पोलिसांनी कारवाई करत दोन जिवंत गोवंश, कत्तल केलेले सुमारे 350 किलो गोमांस पकडले होते. या गुन्ह्यात तीन संशयीतांना पोलिसांनी अटक केली. संशयीतांना बुधवारी यावल न्यायालयात हजर केले असता तिघांना 3 ऑक्टोंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संशयीत कोठडीत
किनगाव, ता.यावल गावातील गौसिया नगर भागात गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करणार्यांवर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, हवालदार रोहिल गणेश, अनिल साळुंके, हितेश बागुल, सचिन पाटील यांनी छापा टाकत दोन जिवंत गोवंश, कत्तल केलेले सुमारे 350 किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, वजनकाटा तसेच दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी रशीद कुरेशी, ईस्माईल कुरेशी, अब्यार कुरेशी, समीर कुरेशी, इस्राईल कुरेशी व इम्तियास कुरेशी या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या समीर सलीम कुरेशी (27), इस्राईल युनूस कुरेशी (20) व इम्तियाज खलील कुरेशी (18, सर्व रा.किनगाव) यांना बुधवारी यावल ल प्रथमवर्ग न्यायालयात न्या.आर.एस.जगताप यांच्या समोर हजर केले असता तिघांना 3 ऑक्टोंबरपर्यंतची तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे.
