वडाळ्यातील भूखंडाच्या एनओसीसाठी लाच ! 50 लाख स्वीकारताना सीपीडब्ल्यू अभियंत्याच्या नातेवाईकासह पाच जण सीबीआयच्या जाळ्यात


मुंबई (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : वडाळ्यातील भूखंडासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीपीडब्ल्यू) मुंबईतील केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीबीआय) कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना अटक केली. या प्रकरणातील लाचेचा व्यवहार 70 लाख रुपयांवर ठरला होता. त्यापैकी 50 लाख रुपये स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.

असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणात उझथऊच्या कार्यकारी अभियंत्याच्या नातेवाईकाला 50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. त्याचबरोबर मुंबईतील एका रिअल इस्टेट समूहाचा उपाध्यक्ष, मॅनेजर तसेच छजउ मागणार्‍या फर्मचा पार्टनर यांनाही अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान, डिस्पॅच रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद न करता 50 लाख रुपयांच्या बदल्यात संबंधित भूखंडासाठी एनओसी देण्यात आल्याचे समोर आले आहे. उर्वरित 20 लाख रुपये आठवड्यानंतर देण्याचे ठरल्याचा आरोप आहे.

सीबीआयने कारवाईनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरातील आरोपींच्या संबंधित ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 50 लाख रुपयांच्या लाचेव्यतिरिक्त आणखी 53.87 लाख रुपयांची रोकड तसेच मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील पाचही आरोपींना मुंबईतील उइख विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

गोवंडीतही महापालिका अधिकारी लाच प्रकरणी अडचणीत
गोवंडी परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या सफाईचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तीन लाख 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन अधिकार्‍यांसह एका खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर विभागाने प्राथमिक पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !