इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आश्वासन देत अकोल्यातील तरुणीवर जळगावात अत्याचार


जळगाव (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : सोशल मिडीयातील इन्स्टाग्राम अ‍ॅपवर ओळख झालेल्या अकोला जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुणीशी सलगी वाढवत तरुणाने विश्वास निर्माण करीत जळगावसह नाशिकमधील विविध हॉटेल्समध्ये नेत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. फसवणुकीची खात्री होताच पीडीतेने तक्रार दिल्यावरून अकोला जिल्ह्यातील तरुणाविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल मिडीयातून ओळख
25 वर्षीय तरुणी अकोला जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी असून ती कामानिमित्त जळगावातील एका भागात वास्तव्याला आहे तर संशयीत आरोपी आकाश गजानन चव्हाण (25, बोरगाव मंजू, जि.अकोला) याच्याशी इन्स्टाग्राम अँपद्वारे ओळख झाली. सततच्या चॅटींगमुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होताच तरुणाने पीडितेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील सारा हॉटेल येथे तसेच 15 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान नाशिक येथील टाउन हाऊस हॉटेलमध्ये पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पीडीतेच्या तक्रारीवरून गुन्हा
पीडीतेसोबत आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर शनिवार,3 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री आठ वाजता जळगाव शहर पोलिात पीडीतेने तक्रार दिल्यावरून आकाश गजानन चव्हाण (35, रा.बोरगाव, ता.जि.अकोला, ह.मु.चित्रकुट, मध्यप्रदेश) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सावित्री ढगे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !