देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह किनगावातील संशयीत जाळ्यात

यावल पोलिसांची गोपनीय माहितीवरून कामगिरी : कारवाईने खळबळ


यावल (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांकडून गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवून नाकाबंदी व गस्त वाढविण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणार्‍या किनगावातील तरुणाला पोलिसांनी अटक केली. पवन कैलास सोनवणे (25, किनगाव बु.॥, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवार, 3 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरू असताना संशयास्पद हालचाली करणार्‍या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयीत पवन कैलास सोनवणे (25, किनगाव बु.॥, ता.यावल) यास चोपडा हायवेवरील किनगाव गावाजवळील हॉटेल श्री समोरून ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता तरुणाच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल (कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे आढळल्याने ती जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई यावल ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, हितेश बागुल तसेच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे, कॉन्स्टेबल सलीम तडवी, मयूर निकम, सचिन घुगे आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !