कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक : रावेर पोलिसांकडून चार गोवंशाची सुटका
रावेर (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : विश्रामजिन्सी (ता.रावेर) कडून रावेरच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने येणार्या चार गोवंश बैलाची रावेर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईने पशूप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
चार गोवंशाची सुटका
विश्रामजिन्सी (ता.रावेर) कडून रावेर शहराकडे येणार्या सुमारे 40 हजार रुपये किंमतीच्या चार गोवंश जातीच्या गुरांची रावेर पोलिसांनी सुटका केली. चार गुरांना मानेवर दोर घट्ट बांधून पळवून हाकलत त्यांना कुठल्याही प्रकारचे चारा पाण्याची सोय न ठेवता भुकेल्या पोटी कत्तल करण्याच्या उद्देशाने नेले जात असताना कारवाई करण्यात आली. या प्रकरणी हवालदार ईश्वर जुलालसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रशीद नत्थु तडवीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहे.


