बांबरुड प्र.ब.विकासो चेअरमनपदी जगन परदेशी तर व्हा.चेअरमनपदी प्रमिलाबाई पाटील बिनविरोध


भडगाव (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : भडगाव तालुक्यातील बांबरुड बहाळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमनपदी जगन भिकारी परदेशी यांची तर व्हा.चेअरमनपदी प्रमिलाबाई लक्ष्मण पाटील या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड 4 रोजी भडगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी प्रथम श्रेणी सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
सोबत प्रेमसिंग राजपूत हे होते. राजेंद्र लालचंद परदेशी यांनी चेअरमन पदाचा तर राहुल सुभाष पाटील यांनी व्हा.चेअरमन पदाचा ठरल्या प्रमाणे राजीनामा दिल्याने या रिक्त जागांसाठी हा निवडीचा कार्यक्रम झाला. यावेळी नवनिर्वाचीत दोघा पदाधिकार्‍यांचा सत्कार संचालक मंडळ, नागरीकांमार्फत करण्यात आला. याप्रसंगी संचालक राजेंद्र लालचंद परदेशी, राहुल सुभाष पाटील, प्रदीप शामराव पाटील, समाधान शिवाजी पाटील, रणजीत संतोष परदेशी, जगन्नाथ त्र्यंबक पाटील, मोहनसिंग फत्तुसिंग परदेशी, परमेश्वर आत्माराम पाटील, रामसिंग बजरंग परदेशी, नारायण देवराम देवरे, कमलबाई कैलास परदेशी आदी संचालक तसेच कैलास पाटील यांच्यासह नागरीक उपस्थित होते. संस्थेचे सचिव संजय पाटील, लिपिक संजय बैरागी यांनी याकामी परीश्रम घेतले.

8 रोजी सकाळी नवनिर्वाचीत चेअरमन जगन परदेशी यांचा सत्कार पत्रकार अशोक परदेशी, ज्ञानेश्वर माळी, गोरखनाथ सोनवणे या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनीही शाल, टोपी, पुष्पहार देउन केला. यावेळी प्रतापसिंग परदेशी, माजी सरपंच रमेश पाटील, समाधान पाटील, रामराव पाटील, विजय परदेशी, नारायण देवरे, तुषार पाटील, लिपीक संजय बैरागी यांचेसह नागरीक उपस्थित होते. या निवडीबद्दल दोघा नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !