भुसावळात किरकोळ वादातून मुलाला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा
भुसावळ (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : मिरवणुकीत शर्ट ओढू नका, मजाक नका करू, असे सांगितल्याच्या वादातून दोघांनी मुलाला कृपाणच्या मागच्या बाजूने मारहाण केली. ही घटना शहरातील बसस्थानकाकडे जाणार्या हनुमान मंदिराजवळ 23 रोजी 7.40 वाजता घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले भुसावळात ?
ओमकारसिंग दर्शनसिंग भाटीया (42, मोतीराम नगर, शिवपूर-कन्हाळा रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुनानक जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत संशयीत त्यांच्या मुलाचा शर्ट ओढत असताना मुलाने प्रतिकार करीत शर्ट ओढू नका, मजाक करू नका, मला ती सहन होत नाही, असे म्हटल्यानंतर वाद झाला व मुलाला मारहाण होत असताना जागीच वाद सोडवण्यात आला. त्यानंतर रात्री 7.40 वाजता संशयीत घरी आल्यानंतर त्यांनी पुन्हा वाद घालत कृपाणच्या मागील बाजूने असलेल्या मुठेने मुलावर हल्ला करीत पळ काढला.
या प्रकरणी संशयीत धनराजसिंग महेंद्रसिंग भाटीया, युवराजसिंग महेंद्रसिंग भाटीया (दोन्ही रा.भिरूड हॉस्पीटलमागे, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जुबेर सिराज तडवी करीत आहेत.
