भुसावळातील नगराध्यक्षा अपात्रता प्रकरण : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण

आता शहरवासीयांचे निकालाकडे लक्ष : चार तास चालला युक्तीवाद


भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना जात पडताळणी समितीने अपात्र ठरवल्याने या निकालाला स्थगिती देण्यासह भुसावळातील रजनी सावकारे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदवत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवार, 8 रोजी दोन्ही बाजूंनी तब्बल चार तास अंतीम युक्तीवाद चालल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली. आता खंडपीठ काय निर्णय देते ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

चार तास चालली सुनावणी
भुसावळच्या तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांच्या जात-प्रमाणपत्राबाबत कागदोपत्री पुराव्यांसह तक्रारी करण्यात आल्यानंतर जिल्हा अनुसूचित जाती पडताळणी समितीने गायत्री भंगाळे-गौर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते तर या निकालाच्या आधारावर राज्य शासनानेही स्वतंत्र आदेश काढत भंगाळेंना अपात्र ठरवले होते. जात पडताळणी समितीने 23 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या या निर्णयाला स्थगिती द्यावी तसेच भुसावळातील रजनी सावकारे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदवत खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांबाबत गेल्या सहा महिन्यांपासून खंडपीठात कामकाज सुरू असून गुरुवारी दोन्ही बाजूंकडून न्या.किशोर संत व न्या.जितेंद्र जैन यांच्या न्यायासनासमोर सविस्तर सुमारे चार तासांपर्यंत युक्तीवाद चालला. खंडपीठाकडून आता कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता असून या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर शहरातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार असल्याने निकालाबाबत राजकारण्यांसह शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !