धुळ्यातील देवपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत घरफोडीच्या गुन्ह्याची केली उकल
सराईत गुन्हेगाराला बेड्या : एक लाख एक हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे (गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026) : धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासांत छडा लावत सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकत पाच मोबाईल हस्तगत केले. या कारवाईत एकूण एक लाख एक हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देवपूर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यात यश आले आहे. अटकेतील आरोपी तौसीफ उर्फ पापा भिकन तांबोळी (22, नेहरु नगर, मास्तरवाडी, देवपूर धुळे) याच्याविरोधात चोरीसह घरफोडीचे तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत.
घरातून रोकड आणि मोबाईलची चोरी
19 ते 20 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान फिर्यादी आजम मोहम्मद फाजील पठाण यांच्या देवपूर, धुळे येथील घरातून अज्ञात चोरट्याने 10 हजारांच्या रोकडसह पाच मोबाईल फोन चोरून नेले होते. याप्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
या गुन्ह्याचा तपास करताना देवपूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढला. पोलिसांनी तौसीफ उर्फ पापा भिकन तांबोळी (22, नेहरु नगर, मास्तरवाडी, देवपूर धुळे) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक लाख एक हजार रुपये किंमतीचे चोरीस गेलेले पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक प्रतापसिंग मोहिते, अंमलदार मिलिंद सोनवणे, किरण मेहरुणकर, महेंद्र भदाणे, भटेंद्र पाटील, राहुल गुंजाळ, नितीन चव्हाण, वसंत कोकणी, सौरभ कुटे, शुभम बोरसे आदींच्या पथकाने केली.
