30 हजारांची लाच भोवली : घोटी ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळज्यात


नाशिक (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : गुन्ह्यातील आरोपींना मदत करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण 30 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील घोटी पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अअक केली आहे. अंबादास निवृत्ती गोवर्धने (45, सांजेगाव, ता.ईगतपुरी) असे अटकेतील कर्मचार्‍याचे नाव आहे.

गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदाराचे नातेवाईक असलेल्या सहा आरोपींसह अन्य आरोपींविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्यासाठी संबंधित पोलीस हवालदाराने प्रत्येक आरोपीकडून पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राकडे 12 ऑगस्टला तक्रार दाखल करण्यात आली.









पंचांसमक्ष लाचेची मागणी
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑगस्ट 2026 रोजी पडताळणी केली. यावेळी संबंधित पोलीस हवालदाराने पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले मात्र सापळ्याची कुणकुण लागताच कर्मचार्‍याचे लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल येताच आरोपीला अटक करण्यात आली.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्यासह पोलीस हवालदार शरद हेबाडे, हवालदार नितीन नेटारे, विनोद चौधरी, अनिल गांगोडे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !