एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

किनगावातील दुचाकी चोरट्यासह अन्य गुन्ह्यात अल्पवयीन ताब्यात : चोरीच्या दोन दुचाकी जप्त


जळगाव (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. एका गुन्ह्यात यावल तालुक्यातील किनगावातील आरोपीला अटक करण्यात आली तर अन्य गुन्ह्यात अल्पवयीनाला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

जळगावातून लांबवली दुचाकी
जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील रहिवासी तरबेज सैय्यद आसीफ यांनी 1 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 टी. 7770) अजिंठा चौफुलीजवळील ईदगाह कॉम्प्लेक्स येथील रिलायबल लॉजिंगच्या खाली पार्किंगमध्ये उभी केल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.









एमएआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणार्‍या संशयिताची ओळख पटवली. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी सापळा रचून सुलेमान अरमान तडवी (34, रा. किनगाव, ता. यावल) याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.

अन्य गुन्ह्यात अल्पवयीन ताब्यात
ळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी कैलास पाटील यांच्या मालकीची काळ्या रंगाची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 डी.एस.5140) 25 ऑक्टोबर 2026 रोजी कुसुंबा शिवारातून चोरीला गेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने तपासात अल्पवयीन बालकाची ओळख निष्पन्न करीत त्याच्याकडून चोरीची हिरो एचएफ डिलक्स दुचाकी जप्त केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेडेडे पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, गजानन महाजन, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, सुभाष साबळे, ललित नारखेडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विष्णू बिर्‍हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !