चोपडा शहर पोलिसांनी रोखली अवैध गोवंशाची वाहतूक : आठ लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त


चोपडा (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : चोपडा शहर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे अवैधरित्या होणारी गोवंशाची वाहतूक रोखत एकाविरोधात कारवाई केली. 30 हजार रुपये किंमतीचा बैल तसेच आठ लाखांचे वाहन मिळून आठ लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा शहर निरीक्षक पवन देसले यांना गोवंशाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 7 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता पथकाला निर्देश दिले. अंबाडे ते खरद जाणार्‍या रस्त्यालगत नितीन धनगर यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेवर चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच.19 सी.एक्स.2580) मध्ये दोरीने बांधून ठेवण्यात आले होते तसेच बैलासाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे कारवाईप्रसंगी दिसून आले.









दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपीने वाहन घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढल. चोपडा शहर पोलिसांनी घटनास्थळावरून चारचाकी वाहन व बैल ताब्यात घेतला. या कारवाईत आठ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी, 30 हजार रुपये किंमतीचा बैल जप्त केला. या प्रकरणी कॉन्स्टेबल समा वली तडवी यांच्या फिर्यादीवरून जयेश शांतराम धनगर (अंबाडे, ता.चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार महेंद्र साळुंखे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !