विनयभंगाच्या आरोपानंतर रावेर तालुक्यातील 65 वर्षीय संशयीताने उचलले टोकाचे पाऊल
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना : अकस्मात मृत्यूची नोंद
रावेर (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोपानंतर रावेर तालुक्यातील एका गावातील संशयीताने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा प्रकार रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवार, 10 रोजी उघडकीस आला. या प्रकरणी निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
रावेर तालुक्यातील एका गावातील चार वर्षीय चिमुकलीसोबत वयोवृद्धाने अश्लील वर्तन केल्याचा आरोप असून या प्रकरणी पीडीतेच्या आईने निंभोरा पोलिसात सोमवारी निंभोरा पोलिसात तक्रार दाखल केली. निंभोरा पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच संशयीत असलेल्या 65 वर्षीय संशयीतांचा शोध सुरू असतानाच मंगळवारी संशयीताने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. निंभोरा पोलिसांना माहिती कळताच सहा.निरीक्षक मीरा देशमुख व सहकार्यांनी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.







