जळगावात बुकस्ट्रीट’ उपक्रमामुळे वाहतूक मार्गात बदल ; 14 व 15 नोव्हेंबरला पर्यायी मार्गांचा वापर करा ; वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांचे आवाहन

काव्यरत्नावली चौक ते महाबळ चौक मार्ग वाहतुकीसाठी बंद


जळगाव (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बुकस्ट्रीट’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. काव्यरत्नावली चौक परिसरात पुस्तकांचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याने शनिवार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून रविवार, 15 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत या परिसरातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जळगाव शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिली.

जळगावात ‘बुकस्ट्रीट उपक्रम’
वाचनालयातर्फे 14 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून 15 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान परिसरात पुस्तकांचा विशेष ‘बुकस्ट्रीट’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात एक लाख पुस्तके वाचकांना मोफत वाटण्यात येणार असल्याने नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

असे असतील पर्यायी मार्ग
काव्यरत्नावली चौकाकडून महाबळ चौकाकडे जाणारी वाहने : या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांनी काव्यरत्नावली चौक, जिल्हाधिकारी बंगला, ऑफिसर्स क्लब, ऑफ हॉर्सिंग सोसायटी गार्डन, मायादेवी नगर बालोद्यान, रोटरी भवन, सैनिक कार्यालय मार्गे महाबळ चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

महाबळ चौकाकडून काव्यरत्नावली चौकाकडे जाणारी वाहने : या दिशेने जाणार्‍या वाहनांनी महाबळ चौक, सैनिक कार्यालयासमोरून रोटरी भवन, मायादेवी नगर बालोद्यान, साने गुरुजी चौक, ऑफिसर्स क्लब, अर्जुन रोड हाऊस मार्गे काव्यरत्नावली चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

वाहतूक नियमांचे करा पालन
वाहनधारकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !