शेतकर्‍यांसाठी मोठा दिलासा ! ई-पीक पाहणी नोंदणीसाठी आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

तांत्रिक अडचणींमुळे पीक नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना संधी : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा


मुंबई (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : राज्यातील शेतकर्‍यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, ई-पीक पाहणी नोंदणीसाठी शासनाने 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मोबाईल पमधील तांत्रिक त्रुटी, जीओ लोकेशनची समस्या, गावांच्या नकाशातील तफावत आणि सर्व्हर डाऊन यांसारख्या अडचणींमुळे अनेक शेतकर्‍यांना निर्धारित वेळेत पीक नोंदणी करता आली नव्हती. त्यामुळे पीक विमा, नुकसानभरपाई आणि शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची चिंता शेतकर्‍यांना सतावत होती. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.

तांत्रिक अडचणींमुळे पीक नोंदणी रखडली
राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाईल पद्वारे नोंदवावी लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पमधील जीओ लोकेशन, गावांच्या नकाशातील तफावत, गट क्रमांक आणि सर्व्हरच्या समस्यांमुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. परिणामी अनेक शेतकर्‍यांची पीक पाहणी अद्याप पूर्ण होऊ शकली नव्हती.

सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाची नोंद
पीक पाहणीच्या नोंदींचा उपयोग पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी केला जातो. त्यामुळे पीक नोंदी अचूक आणि वेळेत होणे आवश्यक आहे. कोणताही शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे शासकीय लाभापासून वंचित राहू नये, या उद्देशाने शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.

30 नोव्हेंबरपूर्वी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन
शासनाच्या या निर्णयामुळे अद्याप ई-पीक पाहणी नोंदणी न करू शकलेल्या शेतकर्‍यांना आणखी एक संधी मिळाली आहे. संबंधित शेतकर्‍यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत 30 नोव्हेंबरपूर्वी पीक नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रलंबित नोंदी पूर्ण करण्यासाठी तलाठी स्तरावरूनही कार्यवाही केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !