पाडळसेतील 32 वर्षीय फोट्रोग्राफरने उचलले टोकाचे पाऊल
यावल (सोमवार, 16 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील पाडळसे या गावातील रहिवासी एका 32 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने भुसावळातील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुभम प्रभाकर पाटील (32) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शुभमने रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने भुसावळातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार नागेंद्र तायडे करीत आहे. उत्तम सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळख असलेल्या मयत शुभमच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.
