किनगावातील इमरान पिंजारी यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती


यावल (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी तथा केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) कार्यरत असलेले इमरान इसा पिंजारी यांची हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती झाली. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

इमरान पिंजारी यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून 19 वर्ष सेवा बजावली आहे व आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण जपले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पदोन्नती मिळाली आहे कॉन्स्टेबल पदावरून हेड कॉन्स्टेबलपदापर्यंतचा हा प्रवास त्यांच्या मेहनतीची आणि सेवाभावाची पावती मानला जात आहे. इमरान पिंजारी यांच्या या यशामुळे मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !