एम.जे.कॉलेजमध्ये जिल्हा युवा महोत्सवाचे 20 नोव्हेंबर रोजी आयोजन
समूह लोकगीत, लोकनृत्य, पथनाट्य, चित्रकला व कविता लेखन स्पर्धांचा समावेश ; युवकांना सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच संस्कृती व परंपरांचे जतन होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने जळगाव जिल्हा युवा महोत्सव 2026-27 चे आयोजन शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी एम. जे. कॉलेज, जळगाव येथे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी सहभागी होणार्या स्पर्धकांची नोंदणी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे.
संपर्क साधण्याचे आवाहन
यंदाच्या जिल्हा युवा महोत्सवात समूह लोकगीत, समूह लोकनृत्य, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेचे नियम, सहभागी कलाकारांची संख्या, रोख पारितोषिके व इतर माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी 9823773797 या क्रमांकावर संपर्क साधावा ,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
