यावल शहरातील डॉ.मोहम्मद साईम कैसर यांचे एफएमजीई परीक्षेत यश : पहिल्याच प्रयत्नात 181 गुण


यावल (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : यावल शहरातील विस्तारीत भागात आयेेशा नगरातील रहिवासी तथा मारूळ येथील शिक्षक स्व. मोहम्मद फारूक यांचे सुपुत्र डॉ. मोहम्मद साईम कैसर यांनी रशियातील बशकिर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.

पहिल्याच प्रयत्नात वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करत त्याने परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा (एफएमजीई) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. या परीक्षेत 300 पैकी 181 गुण प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !