लग्नाच्या आमिषाने जळगावातील महिलेवर अत्याचार : मुलांनाही ठार मारण्याची धमकी
जळगाव (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : लग्न करण्याच्या आमिषाने जळगावातील एका भागातील 30 वर्षीय महिलेवर इचलकरंजी येथील संशयीताने पाच वर्ष अत्याचार केला शिवाय पीडीतेला मारहाण करीत मुलांनाही ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रोहन सुनील गारुंगे (इचलकरंजी, जि.कोल्हापूर) विरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
जळगाव शहरातील एका भागात 30 वर्षीय पीडीता दोन महिलांसह वास्तव्यास आहे. या महिलेची रोहन सुनील गारुंगे (इचलकरंजी, जि.कोल्हापूर) सोबत ओळख झाल्यानंतर त्याचे महिलेकडे येणे-जाणे वाढले. पीडीतेसोबत लग्न करेल, असे आश्वासन देत संशयीताने महिलेवर सन 2020 ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान वेळोवेळी पीडीतेच्या घरी येत अत्याचार केला. त्यानंतर महिलेस मारहाण करीत मुलांना ठार मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप पीडीतेने करीत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय तडवी करीत आहेत.
