यावल शहरात अंत्ययात्रा जाताना एकास जातीवाचक शिविगाळ : दोघांविरोधात गुन्हा


यावल (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : यावल शहरातील बुरूज चौकातुन मेन रस्त्याने बुधवारी अंत्ययात्रा जात असताना दोघांनी एका तरुणाला जातीवाचक व अपमानास्पद बोलून दमदाटी केली व अंत्ययात्रेची वाजंत्री बंद केली. या प्रकरणी यावल पोलिसात दोघांविरोधात अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले यावल शहरात ?
यावल शहरातील श्रीराम नगर भागातील एका कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर बुधवार, 18 नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी अंत्ययात्रा बुरूज चौक ते एच.एच.खान चौक रोडने नगीन मशिदीकडून स्मशान भूमीकडे जात होती. यावेळी संशयीत शहाबुद्दीन उर्फ साबीर इसाबुद्दीन शेख आणि शेख हबीब शेख निसार उर्फ हबीब मंजर यांनी श्रीराम नगर भागातील तक्रारदाराला जातीवाचक आणि अपमानास्पद बोलून दमदाटी करीत अंत्ययात्रेची वाजंत्री बंद केली. तक्रारदाराने यावल पोलिसात तक्रार दिल्यावरून शुक्रवारी अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !